January 19th 2009

Antu Barva - P. L. Deshpande

I came accross Antu Barva by Pu. La. on Scribd. The post is below, but you may have to scroll through the page to read completely.

Continue Reading »

No Comments yet »

November 26th 2008

Pu. La. Deshpande- Paanwala

For those of you interested in listening to ‘Paanwala’ from P. L. Deshpande- it is posted on Marathi Online forums by PAjay. Click on the ‘Forum’ link on top of this page, or check out here.

No Comments yet »

November 25th 2008

आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या!!

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त  करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)

वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड
लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड
आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड
आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची
आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का
द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा
प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी
तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या
नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो
तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली
दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण
बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते … काही
काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी
ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला… (फुल्ल टु
देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी
नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का
भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना
भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी
वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत
इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे
असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले
नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय
विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन
करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे,
संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला
फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)

(Author unknown)

5 Comments »

September 28th 2008

Pu. La. Deshpande- Pestankaka

If you are looking for the good old ‘Pestankaka’ katha- here it is. Just click on the ‘Play’ button to start playing. You’ll need Flash player installed (which about 98% of the computers have- so I am sure you should have it too.). Be patient for a minute while the application connects to server and starts playing- give it a minute or so before you start hearing audio.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

No Comments yet »

July 19th 2008

Marathi Online Forum

For all of you who are looking to intereact for other members, there is a forum available. Feel free to post your favorite article there. You can also write about कथा, कविता, विनोद, महाराष्ट्र- वगैरे वगैरे.

No Comments yet »

August 2nd 2006

जखमांची कर्जे नि कर्जांच्या जखमा

पकूशेठने आपल्या डोळ्यापुढून चाळीसाव्यांदा ती यादी फिरविली आणि पुन्हा एकदा दुःखात वाहून गेले. त्यांच्या यादीत होते अशी काही नावे, ज्यांना त्यांनी उधारी दिली होती. पण घेणाऱ्यांना ती उधारी वाटत नव्हती. त्यांच्यालेखी ते पकूशेठचे त्यांच्यावरील ऋण होते व आजन्म त्याच ऋणात राहण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्यातील काहीजणांनी पकूशेठकडेच नव्हे तर त्यांच्या घराच्या आसपासदेखील फिरकायचे थांबविले होते.

पकूशेठना त्रास होत होता तो त्याचा. एकवेळ पैसे नका देऊ पण असे वागू नका. निदान सांगा तरी पैसे नाही परत करता येणार म्हणून, असे त्यांचे म्हणणे होते. यादी एकेचाळीसाव्यांदा वाचताना त्यांना यादीतील थोर मंडळींनी सांगितलेल्या सबबी आठवल्या. त्या अशाः दिनू दिवेकरः काय पकूशेठ. बरे झाले दिसलात. मला आत्ता काही पैसे हवे होते. इंजिनिअरिंगचा अर्ज भरायचा आहे. हे आत्ताचे व आधीचे सगळे एकत्रच घ्या. पकूशेठः अरे असे कसे..एकतर आधीच्या पैशाला आता वर्ष होत आले…तितक्यात दुसरे कर्ज? दिनूः नाही ना जमत? मग आता हटकू नका. ऐपत असेल तर आणखी पैसे द्या. नसेल तर जुने परत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार तुम्हाला नाही..समजले….? धाड…धाड…धाड….चार लोकांना ऐकू जाईल असा आवज करीत दिनू निघून गेला.

—अंता बोंबीलकरः  काय पकूशेठ, आज इकडे कुठे पकूशेठः काही नाही…तेच तुमच्याकडे माझे येणे बाकी विचारायला आलो होतो. अंताः येणे बाकी…ती तुम्हाला असेल. आम्हाला देणे बाकी काही नाही. पकूशेठ पैसे कुठे पळूनशान जातात का…कशाला उगा त्रास करुन घेता…एवढे मोठे सावकार तुम्ही..आमच्यासारख्याच्या पोटावर पाय कसा द्यावा वाटतो हो तुम्हाला… पकूशेठः पोटावर पाय… अंताः मग नाय तर काय…अहो…तुमच्या पैशातून आणलेली होंडा परवाच विकली. त्यातून जे काही मिळाले होते..त्यातून ही फळाची गाडी घेतली. आता तुमी पैशे मागितले तर मला ही गाडी विकावी लागेल..बरं ती विकूनही फायदा नाही.कारण त्यातून तुमची उदारी फिटणार नाही. आणि जरी विकली तरी तुमचेबी भागणार नाही आणि आमचेबी. त्यापेक्षा जवाकधी धंद्याला बरकत ईल, तवा तुमच्याकडे ही गाडी घेऊनशान येतो की नाय बघा… अंताची गाडी कधी आलीच नाही आणि `हेच फळ काय मम पैशाला…`असा विचार करीत पकूशेठ दुःखी झाले.

— साहेबराव अण्णाः काय पकू..कसा आहेस..लेकरंबाळं मजेत हायंत नवं…? पकूशेठः सगळं बरं आहे…मी जरा त्या माझ्या पैशाची आठवण करुन द्यायला आलो होतो… अण्णाः पैसे…मला आठवतं तसं तू मला काही देणं नाहीस लागत…. पकूशेठः तसं नाही अण्णा…तुम्ही माझ्याकडनं घेतले होते.. अण्णाः तुझ्याकडून….? कधी पकूशेठः अण्णा दोन वर्ष झाली..दोनचारदा तुमच्या कडे निरोपबी धाडला होता. अण्णाः नाही बा…मला काहीच निरोप नाही आला…बरं जाऊदे, तुला पैशाची नड हाय म्हण की…जरा कारखान्यात ऊस जाऊ दे..काहीतरी देतो तुला..नंतर खुशाल परत दे सवडीनं…. पकूशेठः नाही. नको….निघतो.

 नाना सबबी सांगून अनेकांनी पकूशेठच्या कर्जवसुलीची मोहीम कायमची थांबविली…आपल्या भिडस्त स्वभावामुळे नाही म्हणू न शकणारा एक चांगला माणूस समाजाने वापरुन फेकून दिला…अगदी त्याच्या गरजेलाही कोणी धाऊन आले नाही. पकूशेठला जे जाणवलं ते कधीतरी आपल्याला नक्कीच जाणवलेले असते..कारण कर्ज पैशांचीच असतात असं नाही..आणि नातीही रक्ताचीच असतात असंही नाही….  गेली ती उधारीउरला तो चकवा;बुडली ती मैत्रीकशाला आठवा..? दिसला तो जेव्हागाडीतून हसला;धक्का अन तेव्हाधसक्याहून बसला…

No Comments yet »