August 15th 2009

मी, स्वाइन फ्लू..

नमस्कार, मी स्वाइन फ्लू. तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा, पटकी, प्लेग, देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो, या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. याला दुसरं गाव दिसलं नाही काअसा प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर, क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं, कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती उभ्या महाराष्ट्रात स्वीकारली जाते असं पुणेकर अभिमानाने सांगत असतात.

कृपया आहेर आणू नयेतची चळवळ पुण्यातच चालू झाली. आता ती सगळीकडे पसरत आहे. पुणेकरांना आपलंसं केलं तर महाराष्ट्रात पाय पसरायला वेळ लागणार नाही, असा धूर्त विचार मी केला. पुण्यात अवतरण्याने माझी जशी दखल घेतली जाईल तशी दखल मी अन्य ठिकाणी अवतरलो असतो तर घेतली गेली नसती हेही मला ठाऊक झाले होते. वर्षा-दोन वर्षापूर्वी सोलापूर, सांगली, मराठवाडय़ात आमच्या भावकीतला चिकनगुनिया अवतरला होता. त्याने त्यावेळी अनेक विकेटही घेतल्या होत्या. पण ना पेपरवाल्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली ना चॅनेलवाल्यांनी. स्थानिक छोटय़ा पेपरांत दोन-चार दिवस बातम्या छापून आल्या. बस्स. पुण्यात अवतरल्यामुळं मला अशी प्रसिद्धी मिळते आहे की विचारू नका. दररोजच्या पेपरची पान एकची जागा माझ्या नावानं बुक आहे. चॅनेलवाल्यांना तर कोलीतच मिळालंय. पुण्यातल्या पेपरवाल्यांनी उठवलेला जबरदस्त आवाज बघून केंद्रीय आरोग्यमंत्र्याला संसदेत निवेदन करावं लागलं. अशी प्रसिद्धी मी बीड, नांदेडमध्ये अवतरलो असतो तर कधीच मिळाली नसती. याचं कारण पुणेकरांचं सगळं वेगळंच आहे. पुण्यापासून ३०-४० किलोमीटरवरच्या सासवडजवळ हंडाभर पाणी मिळवण्यासाठी लोकांना दोन-दोन मैल पायपीट करावी लागते. पण त्याची चार ओळीची बातमी कधी छापून येत नाही. पण परवा पुण्यात एक वेळ पाणी येणार म्हटल्यावर असा काही कालवा झाला की खुद्द वरुणदेवही घाबरला आणि पुणेकरांच्या पाण्याची गरज भागवण्याइतका बरसून गेला. कालचं शिळं पाणी प्यावं लागणार म्हणून अनेकांचं बीपी वाढलं होतं, तर अनेकांना बोअरच्या पाण्यानं आपल्या चारचाक्या, दुचाक्या धुवाव्या लागणार म्हणून टेन्शन आलं होतं. महाराष्ट्रात अनेक गावांत आठ-आठ तास वीज नसते. पण पुण्याला २४ तास वीज हवी म्हणून खास पॅटर्न तयार केला गेला. वीज मिळते आहे म्हणून कशीही वापरली जाते. चार-पाच मजले उतरायचेही इथल्या लोकांच्या जीवावर येतं. तेवढय़ा पायऱ्या आपण उतरलो तर जगबुडी होईल असं इथल्या लोकांना वाटतं. चार-पाच मजले उतरण्यासाठीही लिफ्ट तळमजल्यावरून वर बोलावतात, अशी इथली स्पेशललोकं आहेत. म्हणूनच आपली टेरर निर्माण करायची असेल तर पुण्याइतकी योग्य जागा शोधून सापडणार नाही हे मी ओळखलं होतं. माझा अंदाज किती खरा ठरला हे दिसतं आहेच.
खरं तर मी पुण्यात यायला बिचकत
होतो. तिथल्या प्रदूषणात आपला टिकाव लागणार नाही असं मला वाटत होतं. इथले लोक अजिबात चालत नाहीत. टिळक रोडवरचा माणूस फुले मंडईतही सॅंट्रो, अल्टो किंवा हिरो होंडा घेऊन जातो. आपके पॉंव बहुत हसीन है, इन्हें जमींपर मत रखिये’, असं पाकिजातल्या राजकुमारप्रमाणं पुणेकरांना कोणीतरी सांगितलं आहे की काय कोणास ठाऊक? इतक्या गाडय़ांच्या धुरामुळं आपल्या अंगावर रॅश उठेल अशी भीती माझ्या मनात होती. एकदाचा मी इथं आलो. पुणेकर कुणाला तरी घाबरतात हे बघून मला अत्यंत आनंद झाला. सगळ्या जगात ट्रॅफिक सिग्नलला किती मान आहे. एका लाल दिव्यासरशी शेकडो मोटारी एका क्षणात आहे त्या जागेवर थांबतात. पण तोच सिग्नल इथं बिच्चारा होऊन जातो. त्याच्याकडे कुणी बघतच नाही. घाबरायचं तर लांबच राहिलं. मला मात्र सगळे जाम घाबरलेत. सगळीकडे मास्कधारकांच्या फौजा दिसताहेत. घरोघरी माझीच चर्चा आहे. अनेकांनी बराक ओबामालाच इ मेल करून मला एक्सपोर्ट केल्याबद्दल धारेवर धरलंय असं कळतंय. माझ्यापासून कसं वाचता येईल याचा विचार चालू आहे.

No Comments yet »

July 20th 2008

मराठी भाषेचं भवितव्य धोक्यात आहे

मराठी भाषेचं भवितव्य धोक्यात आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी, तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी केलीच जातात. साहित्य संमेलनाच्या मोसमात तर हमखासच. पण यंदाच्या ८० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांचा यासंदर्भातील दृष्टिकोन निव्वळ या प्रतिपादनांपुरता मर्यादित नाही. भाषेच्या प्रश्ानचा अत्यंत व्यापक असा आढावा घेत त्यांनी त्यावर तितकाच अभ्यासपूर्ण आणि प्रभावी असा अॅक्शन प्लान सुचविला आहे. महाराष्ट्र टाइम्सचे गेस्ट एडिटर म्हणून संमेलनाध्यक्षांनी लिहिलेला हा विशेष लेख. <!–more–>

भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नसून भारतातील सर्व भाषक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत. आणि थोडी देशाबाहेर दृष्टी टाकली तर जगातील सर्वच लोकांना आपापली भाषा कशी वाचवायची आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे कसे रक्षण करायचे असा प्रश्न पडू लागला आहे. त्याला इंग्रजी भाषेची मायभूमी ब्रिटन आणि आता अमेरिका यांचाही अपवाद नाही. हजारो वर्षांत जगातील विविध भाषांचा एकमेकांशी जेवढा संपर्क आला नसेल तेव.ढा गेल्या शंभर वर्षात आला. पण गतशतकाच्या शेवटच्या दशकात डिजिटल क्रांती वयात आल्यावर परस्पर संवादाचा वेग आणि आवाका प्रचंड प्रमाणावर वाढला. वाहतुकीची साधने आणि त्यांची गती वाढली. त्यामुळे जगातील सर्वभाषक लोकांचा विविध आघाड्यांवर, विविध क्षेत्रांत परस्परांशी इतका व्यापक आणि विस्तृत संपर्क व संवाद होऊ लागला आहे की त्याला मानवी इतिहासात तुलना नाही. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान वाढीच्या गतीने प्रवेग घेतला असताना करमणुकीपासून तो विज्ञान-शास्त्रांपर्यंत बहुतेक विषय सर्वांना समजू शकतील अशी जागतिक भाषा उत्क्रांत होणे अपरिहार्य आहे. सर्वांना भीती तीच आहे - या जागतिक सुपर-भाषेपुढे आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा कसा टिकाव लागणार? युरोपातील छोट्या देशांमधील भाषांनाच नव्हे तर जर्मन, फ्रेंच, डॅनिश, स्पॅनिश आणि पोर्तुगीज अशा समर्थ भाषांपुढेही हा पेच पडला आहे. चिनी आणि रशियन भाषकांनी जगाच्या बाजारात टिकाव धरण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंग्रजी शिकायला सुरुवात केली आहे. तिकडे इंग्लंड-अमेरिकेत मात्र आपलीच भाषा आपल्याला अनोळखी होते की काय अशी चिंता वाटू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या भवितव्याबद्दल गंभीर विचार व्हायला पाहिजे. खरे म्हणजे महाराष्ट्राचा प्रश्न जेवढा गंभीर आहे तेवढाच तो तामीळनाडु, कर्नाटक, आसाम आणि बंगालचाही आहे. फक्त या भाषकांची सरकारे आणि लोक अस्मिता व संस्कृती संरक्षणासाठी टोकाची अतिरेकी भूमिका घेतात तसे महाराष्ट्रात होत नाही. हे औदार्याचे आणि सहिष्णुतेचे लक्षण वरवर वाटत असले तरी<br />\r\nवस्तुस्थिती अशी आहे की मराठी माणसाचा न्यूनगंड, भाषेबद्दलची बेफिकीरी आणि शासनाचा व मराठी बुद्धिवंतांचा बोटचेपेपणा आणि इच्छाशक्तीचा अभाव या गोष्टीच वरील सदगुणांना कारणीभूत आहेत असे म्हणावे लागेल. त्यामुळे भाषेची अधिक हेळसांड होते ही दुदैर्वी वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ महाराष्ट्राने कानडी किंवा आसामी अतिरेक्यांप्रमाणे वागावे असा नव्हे. उलट भाषेच्या प्रश्नाकडे nव्यापक परिप्रेक्ष्यातून सुसंस्कृतपणे कसे बघावे त्याचे दिशादर्शन महाराष्ट्र करू शकतो. मात्र त्यासाठी देखील आपल्या सत्ताधाऱ्यांना आणि सांस्कृतिक पुढाऱ्यांना इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी हवी.

खरे म्हणजे संपूर्ण भारतानेच भाषाप्रश्नाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. घटनासंमत अशा २१ अधिकृत भाषा भारतात असल्या तरी एकूण १७०० बोलीभाषा मातृभाषा म्हणून वापरल्या जातात. जगातील दुसऱ्या कोणत्याही देशात एवढे भाषावैचित्र्य आढळणार नाही. भाषा हे निव्वळ संवाद साधन नसून तिचा संबंध इतिहास, संस्कृती, अस्मिता आणि वंश यांच्याशीही जोडला जातो. हे स्फोटक मिश्रण भारतात ठासून भरलेले आहे. पुढील काही वर्षांत म्हणजे आथिर्क प्रगतीची घोडदौड होत असताना हे भाषिक व सांस्कृतिक संघर्ष वाढणे अटळ आहे. म्हणून भारताची एकता टिकवून प्रगतीची वाटचाल कायम ठेवण्यासाठी भाषेचा प्रश्न चिघळण्याआधीच ऐरणीवर घेणे आवश्यक आहे. औदार्य व सहिष्णुता हे जे गुण मराठी माणसाला अनाहूतपणे चिकटले आहेत त्यांचा फायदा घेऊन महाराष्ट्र या विषयात धोरणात्मक पुढाकार घेऊ शकतो.

करायचे काय आहे? हिंदीसह भारतातील बहुतेक भाषा या उत्क्रांत होणाऱ्या जग-व्यवहाराच्या भाषेशी स्पर्धा करू शकणार नाहीत. त्यामुळे बहुभाषिकता हे यापुढच्या पिढ्यांचे लक्षण ठरणार आहे. उच्च शिक्षण, करिअर व व्यवहार यासाठी जागतिक भाषा, आपल्या समाजातील व कुटुंबातील व्यवहार, सांस्कृतिक व साहित्य व्यवहार यासाठी राज्यभाषा म्हणजेच मातृभाषा आणि व्यवसाय व भौगोलिक स्थानपरत्वे इतर संपर्कभाषा. दिल्ली, मुंबई, बंगलोर अशा शहरांतील प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील मुले अशी बहुभाषक बनतात. त्यांचे प्रमाण इतरत्रही पसरत आहे. प्रश्न आहे तो आपापल्या मातृभाषांचे संवर्धन करण्याचा, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे व साहित्याचे संचित जपून त्याचे प्रतिबिंब जागतिक भाषेत नेण्याचा आणि अस्मिता रक्षणाचा. बालकांची आकलनशक्ती मातृभाषेतच अधिकतर तीव्र आणि परिपूर्ण असते या जगमान्य सिद्धांताचे काय झाले याचा शोध घ्यायला हवा. त्यामुळे जागतिक भाषेची तोंडओळख करून घेत असताना प्राथमिक ज्ञानग्रहण मातृभाषेत झाले पाहिजे हा आग्रह कितपत योग्य आहे याचीही शहानिशा झाली पाहिजे. भारतीय राज्यांची भाषिक पुनर्रचना करतांना जो सिद्धांत गृहित धरला होता त्याचा नीट पाठपुरावा ना केंद सरकारने केला ना राज्य सरकारांनी. या गोष्टीचीही झाडाझडती झाली पहिजे.

इच्छाशक्ती आणि कळकळ असेल तर महाराष्ट्र या विषयात पुढाकार घेऊ शकतो. त्यासाठी सध्याच्या भाषा व साहित्यसंबंधी असलेल्या शासकीय संस्थांना बाजूला ठेवून उच्च आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भाषातज्ज्ञांचा भाषा आयोग निर्माण करता येईल. त्यामार्फत महाराष्ट्रातील भाषा प्रश्नाचा जागतिक व भारतीय पार्श्वभूमीवर समग्र व सखोल अभ्यास करून मराठी भाषेच्या वर्तमान व भवितव्यविषयक वास्तवाचे<br />\r\nआणि अंदाजाचे वस्तुनिष्ठ निवेदन करणारा सविस्तर अहवाल सादर करता येईल. मराठी भाषेचे विविध आघाड्यांवर संवर्धन व संरक्षण करण्याचे कंकण बांधलेल्या कितीतरी स्वयंसेवी संघटना महाराष्ट्रात तळमळीने काम करीत आहेत. शासकीय भाषा व संस्कृती विभाग, विद्यापीठातील मराठी विभाग, अधिकृत साहित्य संस्था, परिषदा, मंडळे, संघ भाषाविषयक किंवा साहित्यविषयक असे काही काम करतांना क्वचितच दिसतात.<br />\r\nतथापि याही सर्व संस्था-परिषदा-विद्यापीठांना या कामात सामील करून घेतलेले बरे.

वस्तुनिष्ठ निवेदन व अंदाजावर आधारित हा आयोग धोरणात्मक निदेर्शन देखील करू शकेल. पुढील चार बाबतीतच धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची कणखरपणे अंमलबजावणी करावी लागेल.

अ)प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षणाचे माध्यम. विज्ञान शाखांचे व तंत्रज्ञानांचे शिक्षण मराठीत देणे कितपत शक्य आहे व त्यासाठी काय तयारी करावी लागेल - विशेषत: सोप्या परिभाषेची - त्याची आखणी करावी लागेल. याबाबतीत मात्र सर्वत्र समान धोरण हवे. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होते. जगभरातील माहिती व ज्ञान संचयाला ते हात घालू शकतात व स्पधेर्मधे पुढे निघून जातात. मराठी माध्यमाच्या मुलांना न्यूनगंड निर्माण होतो. राज्यघटनेनुसार अधिकृत राज्यभाषेचा माध्यम म्हणून सर्व शाळांवर सक्ती करता येत नसेल तर समानता राखण्यासाठी अटळपणे माध्यमिक शाळांचे माध्यम इंग्रजी ठेवणे भाग पडेल. त्यामधे ग्रामीण भागात मराठी आणि शहरी भागात इंग्रजी असा दुजा भाव करणे म्हणजे भविष्यासाठी भयंकर विषमतेची आणि संघर्षाची बीजे पेरल्यासारखे होईल. या आयोगानेच योग्य मार्गदर्शन करावे लागेल. आ)माध्यम म्हणून इंग्रजी भाषेचा स्वीकार केला नाही तरी जोडभाषा म्हणून शिकविण्यासाठी उत्तम दर्जाचे इंग्रजी व मराठी भाषा शिक्षक ग्रामीण भागात नेमणे. मुलांना ज्ञानभाषा आणि मातृभाषा दोन्ही चांगल्या आल्या पाहिजेत. माध्यम कोणतेही असो. जे तज्ज्ञ ठरवितील. इ)शिक्षणाचे माध्यम कोणतेही असले तरी राज्यातील सार्वजनिक व शासकीय व्यवहारात शक्यतो मराठीचा वापर होणे. शासनाने धोरणविषयक निर्णय घेऊन हे होणार नाही. त्यासाठी लोकांमधेच स्वभाषेचे सच्चे प्रेम हवे. ई)मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य इंग्रजी-हिंदीमधे किंवा नव्या जागतिक भाषेमधे नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा. महाराष्ट्रात शासन किंवा साहित्य संस्था कोणीही याबाबतीत संघटित प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे खरेच जागतिक भाषेचा लोंढा आला तर मराठीची परिस्थिती कठीण होईल. इ)महाराष्ट्राचे भाषाविषयक धोरण अखिल भारतीय धोरणाशी सुसंगत ठेवणे.

असे कोणते भाषाविषयक समान सूत्र आज तरी भारतात नाही. त्यामुळे महागड्या पब्लिक स्कूलांमधून शिकलेले आणि इंग्रजी ही मातृभाषेसारखीच असलेले आणि इतर भारतीय भाषांपासून दुरावलेले लोकच आज भारतावर औपचारिक आणि अनौपचारिक सत्ता गाजवतात. हे थांबवून भारतीय संस्कृतीचे संचित उगवत्या जागतिक संस्कृतीशी जोडायचे असेल तर सर्व प्रांतांमधून उठाव करून भाषाविषयक समान सूत्र स्वीकारायला हवे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाषातज्ज्ञ राष्ट्रपातळीवर मुख्यमंत्र्यांची व तज्ज्ञांची बैठक आयोजित करून राष्ट्रीय भाषा आयोग नेमण्याचा आग्रह धरू शकतात. प्रश्न तेवढा गंभीर आणि सर्वव्यापी आहे. कोणा एकाच भारतीय भाषेत आपण सर्व व्यवहार करू शकू, विज्ञान-तंत्रज्ञानाचा पूर्ण अवलंब करून उच्च दर्जा गाठू शकू आणि जागतिक स्पधेर्त टिकू शकू हा भ्रम आहे हे लवकरच लक्षात nयेईल. म्हणूनच असा व्यापक विचार-विनिमय करून धोरणे ठरविणे आताच आवश्यक झाले आहे.

प्रश्न आहे नेत्यांच्या इच्छाशक्तीचा आणि दूरदृष्टीचा. त्यांचा अभाव कायम राहिला तर भाषा-विषमता वाढीस लागून गंभीर परिस्थिती उदभवू शकेल. सगळ्यात जास्त तडाखा महाराष्ट्राला बसेल कारण आपण मराठी माणसे एका बाजूला इतरांपेक्षा मातृभाषेविषयी अत्यंत बेफिकीर असून तिला तुच्छपणे तर वागवतोच आणि दुसऱ्या बाजूला मात्र मराठीत सर्व काही आनंदी आनंद असून तिला काही झाले नाही, ही फक्त अमेरिकेत मुले पाठविणाऱ्या शहरी मध्यमवगीर्यांची ओरड आहे, असे सांगून निष्पाप मुलांना फसवीत असतो.

No Comments yet »