Deprecated: Assigning the return value of new by reference is deprecated in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-settings.php on line 472

Deprecated: Assigning the return value of new by reference is deprecated in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-settings.php on line 487

Deprecated: Assigning the return value of new by reference is deprecated in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-settings.php on line 494

Deprecated: Assigning the return value of new by reference is deprecated in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-settings.php on line 530

Strict Standards: Declaration of Walker_Page::start_lvl() should be compatible with Walker::start_lvl(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 594

Strict Standards: Declaration of Walker_Page::end_lvl() should be compatible with Walker::end_lvl(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 594

Strict Standards: Declaration of Walker_Page::start_el() should be compatible with Walker::start_el(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 594

Strict Standards: Declaration of Walker_Page::end_el() should be compatible with Walker::end_el(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 594

Strict Standards: Declaration of Walker_PageDropdown::start_el() should be compatible with Walker::start_el(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 611

Strict Standards: Declaration of Walker_Category::start_lvl() should be compatible with Walker::start_lvl(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 705

Strict Standards: Declaration of Walker_Category::end_lvl() should be compatible with Walker::end_lvl(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 705

Strict Standards: Declaration of Walker_Category::start_el() should be compatible with Walker::start_el(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 705

Strict Standards: Declaration of Walker_Category::end_el() should be compatible with Walker::end_el(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 705

Strict Standards: Declaration of Walker_CategoryDropdown::start_el() should be compatible with Walker::start_el(&$output) in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/classes.php on line 728

Strict Standards: Redefining already defined constructor for class wpdb in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/wp-db.php on line 306

Deprecated: Assigning the return value of new by reference is deprecated in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/cache.php on line 103

Strict Standards: Redefining already defined constructor for class WP_Object_Cache in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/cache.php on line 425

Deprecated: Assigning the return value of new by reference is deprecated in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/query.php on line 21

Deprecated: Assigning the return value of new by reference is deprecated in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/theme.php on line 623

Strict Standards: Redefining already defined constructor for class WP_Dependencies in /homepages/4/d289104336/htdocs/marathionline/wp-includes/class.wp-dependencies.php on line 15
Marathi Online » Marathi

August 15th 2009

मी, स्वाइन फ्लू..

नमस्कार, मी स्वाइन फ्लू. तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा, पटकी, प्लेग, देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो, या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. याला दुसरं गाव दिसलं नाही काअसा प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर, क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं, कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती उभ्या महाराष्ट्रात स्वीकारली जाते असं पुणेकर अभिमानाने सांगत असतात.

कृपया आहेर आणू नयेतची चळवळ पुण्यातच चालू झाली. आता ती सगळीकडे पसरत आहे. पुणेकरांना आपलंसं केलं तर महाराष्ट्रात पाय पसरायला वेळ लागणार नाही, असा धूर्त विचार मी केला. पुण्यात अवतरण्याने माझी जशी दखल घेतली जाईल तशी दखल मी अन्य ठिकाणी अवतरलो असतो तर घेतली गेली नसती हेही मला ठाऊक झाले होते. वर्षा-दोन वर्षापूर्वी सोलापूर, सांगली, मराठवाडय़ात आमच्या भावकीतला चिकनगुनिया अवतरला होता. त्याने त्यावेळी अनेक विकेटही घेतल्या होत्या. पण ना पेपरवाल्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली ना चॅनेलवाल्यांनी. स्थानिक छोटय़ा पेपरांत दोन-चार दिवस बातम्या छापून आल्या. बस्स. पुण्यात अवतरल्यामुळं मला अशी प्रसिद्धी मिळते आहे की विचारू नका. दररोजच्या पेपरची पान एकची जागा माझ्या नावानं बुक आहे. चॅनेलवाल्यांना तर कोलीतच मिळालंय. पुण्यातल्या पेपरवाल्यांनी उठवलेला जबरदस्त आवाज बघून केंद्रीय आरोग्यमंत्र्याला संसदेत निवेदन करावं लागलं. अशी प्रसिद्धी मी बीड, नांदेडमध्ये अवतरलो असतो तर कधीच मिळाली नसती. याचं कारण पुणेकरांचं सगळं वेगळंच आहे. पुण्यापासून ३०-४० किलोमीटरवरच्या सासवडजवळ हंडाभर पाणी मिळवण्यासाठी लोकांना दोन-दोन मैल पायपीट करावी लागते. पण त्याची चार ओळीची बातमी कधी छापून येत नाही. पण परवा पुण्यात एक वेळ पाणी येणार म्हटल्यावर असा काही कालवा झाला की खुद्द वरुणदेवही घाबरला आणि पुणेकरांच्या पाण्याची गरज भागवण्याइतका बरसून गेला. कालचं शिळं पाणी प्यावं लागणार म्हणून अनेकांचं बीपी वाढलं होतं, तर अनेकांना बोअरच्या पाण्यानं आपल्या चारचाक्या, दुचाक्या धुवाव्या लागणार म्हणून टेन्शन आलं होतं. महाराष्ट्रात अनेक गावांत आठ-आठ तास वीज नसते. पण पुण्याला २४ तास वीज हवी म्हणून खास पॅटर्न तयार केला गेला. वीज मिळते आहे म्हणून कशीही वापरली जाते. चार-पाच मजले उतरायचेही इथल्या लोकांच्या जीवावर येतं. तेवढय़ा पायऱ्या आपण उतरलो तर जगबुडी होईल असं इथल्या लोकांना वाटतं. चार-पाच मजले उतरण्यासाठीही लिफ्ट तळमजल्यावरून वर बोलावतात, अशी इथली स्पेशललोकं आहेत. म्हणूनच आपली टेरर निर्माण करायची असेल तर पुण्याइतकी योग्य जागा शोधून सापडणार नाही हे मी ओळखलं होतं. माझा अंदाज किती खरा ठरला हे दिसतं आहेच.
खरं तर मी पुण्यात यायला बिचकत
होतो. तिथल्या प्रदूषणात आपला टिकाव लागणार नाही असं मला वाटत होतं. इथले लोक अजिबात चालत नाहीत. टिळक रोडवरचा माणूस फुले मंडईतही सॅंट्रो, अल्टो किंवा हिरो होंडा घेऊन जातो. आपके पॉंव बहुत हसीन है, इन्हें जमींपर मत रखिये’, असं पाकिजातल्या राजकुमारप्रमाणं पुणेकरांना कोणीतरी सांगितलं आहे की काय कोणास ठाऊक? इतक्या गाडय़ांच्या धुरामुळं आपल्या अंगावर रॅश उठेल अशी भीती माझ्या मनात होती. एकदाचा मी इथं आलो. पुणेकर कुणाला तरी घाबरतात हे बघून मला अत्यंत आनंद झाला. सगळ्या जगात ट्रॅफिक सिग्नलला किती मान आहे. एका लाल दिव्यासरशी शेकडो मोटारी एका क्षणात आहे त्या जागेवर थांबतात. पण तोच सिग्नल इथं बिच्चारा होऊन जातो. त्याच्याकडे कुणी बघतच नाही. घाबरायचं तर लांबच राहिलं. मला मात्र सगळे जाम घाबरलेत. सगळीकडे मास्कधारकांच्या फौजा दिसताहेत. घरोघरी माझीच चर्चा आहे. अनेकांनी बराक ओबामालाच इ मेल करून मला एक्सपोर्ट केल्याबद्दल धारेवर धरलंय असं कळतंय. माझ्यापासून कसं वाचता येईल याचा विचार चालू आहे.

No Comments yet »

March 28th 2009

दुधवाच्या जंगलात…

“दुधवा” हे भारत-नेपाळ सरहद्दीवरील संरक्षीत अभयारण्य आहे.
त्या जंगलातील वास्तव्यात असतांना झालेल्या वाघाच्या दुर्मीळ दर्शनानंतर मला सुचलेली ही कविता…
-स्वागत

दुधवाच्या जंगलात…

दुधवाच्या जंगलात
आम्हाला एक वाघ दिसला,
पाहताच क्षणी सगळयांना
तो उंच गवतात जाऊन बसला.

पाहून त्या वाघाला
सारेच जण आनंदले,
डोळ्यात आमच्या उत्साहाचे
भाव ते दाटून आले.

पुन्हा तो दिसावा असे
सा-यांना वाटू लागले,
नि:स्तब्ध निरव शांततेत
प्रतिक्षा करू लागले.

बराच वेळ झाला तरी
बाहेर तो येईना,
दर्शनाची झलकही
तो काही देईना.

प्रतिक्षेची हद्द होऊन
एक महिला वैतागली,
दुस-या जंगलातील वाघांचे ती
मोठयाने कौतूक करू लागली.

“अमक्या तमक्या जंगलात
बरेच वाघ दिसतात,
अवती भोवती दोन जीप्सच्या
बिनधास्त सारे फिरतात.”

वाघाने ते ऐकले
अन् एक डरकाळी फोडली,
मला तिथेच सोडून सा-यांनी
जीप भरधाव सोडली.

दुधवाच्या त्या रानवाटेवर
मी एकटाच उभा होतो,
वाघ लपलेल्या जागेकडे
टक लावून पाहात होतो.

माझ्यापासून वाघाचे
अंतर तसे फार नव्हते,
अंदाजाने माझ्या ते
केवळ दहा-बारा मीटर होते.

अवती भोवती सगळीकडे
माझी नजर शोधू लागली,
आसला घेण्याजोगी नव्हती
एकही तिथे जागा चांगली.

गवतामध्ये सळसळ झाली
अन् माझा श्वास थांबला,
दमदार पाऊले टाकत समोर
प्रत्यक्ष वाघच उभा ठाकला.

राजबिंडया त्या रुपाने
मनोमनी मी भारावलो,
त्याच्या त्या दर्शनाने
अंत:र्यामी मी सुखावलो.

खूप वेळ आम्ही दोघे
एकमेकांना निरखत होतो,
आता पुढे काय होईल
याचा अंदाज घेत होतो.

शब्दांची करून जुळवा जुळव
मी विचारणार त्याला काही…
…तोच म्हणाला, “घाबरू नकोस,
मी तुला खाणार नाही.”

मी आनंदलो, फोटो त्याचा
काढण्यासाठी थोडा पुढे सरसावलो,
पण त्याच्या पुढील वाक्यांनी
जागच्या जागीच स्थिरावलो…

“आहेत माझे प्रश्न काही
उत्तर तू देणार का?
निसर्गाच्या विनाशाला
जबाबदार कोण तू सांगणार का?

लोकसंख्या वाढत गेली
गावे, नगरे फुगत चालली,
जंगल झाडे तुटत गेली
पक्षी कोटरे उजाड जाहली.

हिरवी कुरणे खुरटी झाली
रानफुलेही लूप्त झाली.
फुलपाखरे, किटक, प्राणी
सारी सारी बेघर झाली.

जीवनोपयोगी वृक्षांच्याही
अनेक जाती दुर्मीळ झाल्या.
मुक्त विहरणा-या वनचरांच्या
पिढयान् पिढया शिकारीत मेल्या.

अतिक्रमण केले तुम्ही म्हणोनी
आम्हीही वस्तीत शिरू लागलो,
भेकड मानवाच्या कपट चालीने
अलगद पिंज-यात अडकू लागलो.

निसर्गचक्र खंडीत करण्याचा
परिणाम पुढे होणार काय?
आम्ही आता संपत चाललो
तुमचे पुढे होणार काय?

चिऊ-काऊ, वाघ-सिंहाच्या गोष्टीच नुसत्या
पुढच्या पिढीला सांगणार काय?
प्रत्यक्ष बघण्याचा धरला जर हट्ट त्यांनी
तर तुम्ही दाखविणार काय?”

वाघाच्या त्या सरबत्तीने
मला काही सुचेना,
काय त्याला उत्तर द्यावे
मजला काही उमजेना.

पाहून माझी ती अवस्था
तो वाघ मोठयाने हसला,
“माझा एक फोटो काढ.”
ऐटीत तो मला म्हंटला.

पडत्या फळाची आज्ञा मानून
मी कॅमेरा हाती घेतला,
दुधवाच्या जंगलातील वाघाचा
एक फोटो अलगद टिपला.

वाघ हळूच मागे वळला
दोन पाऊले चालत गेला,
अचानक तो फिरूनी वळला
आणि हसूनी मला म्हणाला…

“जगला वाचलास तर…
हो फोटो मानवाच्या पुढच्या पिढीला दाखव…
…आणि त्यांना सांग,
दुधवाच्या जंगलात, मी एक वाघ पाहिला…
…खरंच,
दुधवाच्या जंगलात मी एक जीवंत वाघ पाहिला.”
- स्वागत थोरात,
दुधवा,

No Comments yet »

January 19th 2009

Antu Barva - P. L. Deshpande

I came accross Antu Barva by Pu. La. on Scribd. The post is below, but you may have to scroll through the page to read completely.

Continue Reading »

No Comments yet »

November 26th 2008

Pu. La. Deshpande- Paanwala

For those of you interested in listening to ‘Paanwala’ from P. L. Deshpande- it is posted on Marathi Online forums by PAjay. Click on the ‘Forum’ link on top of this page, or check out here.

No Comments yet »

November 25th 2008

आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या!!

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त  करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)

वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड
लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड
आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड
आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची
आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का
द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा
प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी
तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या
नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो
तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली
दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण
बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते … काही
काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी
ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला… (फुल्ल टु
देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी
नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का
भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना
भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी
वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत
इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे
असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले
नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय
विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन
करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे,
संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला
फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)

(Author unknown)

5 Comments »

November 24th 2008

Vapurza on Marathionline forum

For all of you who uave been requesring Vapuraa- it is available on Marathi Online forum. Click on the Forum link on top of this page or check it out here.

1 Comment »

November 5th 2008

Mi ek pulakit - on Marathi Online Forums

Pramod Dev has written a nice short story on Marathi Online forums about Pu. La. Deshpande- mi ek pulakit. Check it out on Marathi Online Forums.

No Comments yet »

November 2nd 2008

Anil Kumble retires from test cricket

Well- after 18 valient years in cricket- Anil Kumble announced his retirement today. Hats off to a great cricketer! He will go down in history as the third highest wicket time till date, and the only bowler after Jim Laker to take all the 10 wickets in an innings. It is indeed good to see that all the cricketing role models have started to step and retire at right time unlike our heroes from the past. First it was Saurav, and now Anil. This is a much more dignified way of retiring than to keep on playing till your contribution almost becomes zero, and you start to drag the entire team down because of poor performance.

I just hope this gives way to young talent who are eager to earn spot in the team, and perform.

No Comments yet »

September 30th 2008

Marathi Charolya on Marathi Online Forum

For those of you generally interested in Marathi Charolya- there is a big - long thread going on on Marathi Online Forums. (And it is one of the most popular threads). Check it out here and yah- keep posting!

No Comments yet »

July 20th 2008

मराठी भाषेचं भवितव्य धोक्यात आहे

मराठी भाषेचं भवितव्य धोक्यात आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी, तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी केलीच जातात. साहित्य संमेलनाच्या मोसमात तर हमखासच. पण यंदाच्या ८० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांचा यासंदर्भातील दृष्टिकोन निव्वळ या प्रतिपादनांपुरता मर्यादित नाही. भाषेच्या प्रश्ानचा अत्यंत व्यापक असा आढावा घेत त्यांनी त्यावर तितकाच अभ्यासपूर्ण आणि प्रभावी असा अॅक्शन प्लान सुचविला आहे. महाराष्ट्र टाइम्सचे गेस्ट एडिटर म्हणून संमेलनाध्यक्षांनी लिहिलेला हा विशेष लेख. <!–more–>

भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नसून भारतातील सर्व भाषक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत. आणि थोडी देशाबाहेर दृष्टी टाकली तर जगातील सर्वच लोकांना आपापली भाषा कशी वाचवायची आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे कसे रक्षण करायचे असा प्रश्न पडू लागला आहे. त्याला इंग्रजी भाषेची मायभूमी ब्रिटन आणि आता अमेरिका यांचाही अपवाद नाही. हजारो वर्षांत जगातील विविध भाषांचा एकमेकांशी जेवढा संपर्क आला नसेल तेव.ढा गेल्या शंभर वर्षात आला. पण गतशतकाच्या शेवटच्या दशकात डिजिटल क्रांती वयात आल्यावर परस्पर संवादाचा वेग आणि आवाका प्रचंड प्रमाणावर वाढला. वाहतुकीची साधने आणि त्यांची गती वाढली. त्यामुळे जगातील सर्वभाषक लोकांचा विविध आघाड्यांवर, विविध क्षेत्रांत परस्परांशी इतका व्यापक आणि विस्तृत संपर्क व संवाद होऊ लागला आहे की त्याला मानवी इतिहासात तुलना नाही. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान वाढीच्या गतीने प्रवेग घेतला असताना करमणुकीपासून तो विज्ञान-शास्त्रांपर्यंत बहुतेक विषय सर्वांना समजू शकतील अशी जागतिक भाषा उत्क्रांत होणे अपरिहार्य आहे. सर्वांना भीती तीच आहे - या जागतिक सुपर-भाषेपुढे आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा कसा टिकाव लागणार? युरोपातील छोट्या देशांमधील भाषांनाच नव्हे तर जर्मन, फ्रेंच, डॅनिश, स्पॅनिश आणि पोर्तुगीज अशा समर्थ भाषांपुढेही हा पेच पडला आहे. चिनी आणि रशियन भाषकांनी जगाच्या बाजारात टिकाव धरण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंग्रजी शिकायला सुरुवात केली आहे. तिकडे इंग्लंड-अमेरिकेत मात्र आपलीच भाषा आपल्याला अनोळखी होते की काय अशी चिंता वाटू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या भवितव्याबद्दल गंभीर विचार व्हायला पाहिजे. खरे म्हणजे महाराष्ट्राचा प्रश्न जेवढा गंभीर आहे तेवढाच तो तामीळनाडु, कर्नाटक, आसाम आणि बंगालचाही आहे. फक्त या भाषकांची सरकारे आणि लोक अस्मिता व संस्कृती संरक्षणासाठी टोकाची अतिरेकी भूमिका घेतात तसे महाराष्ट्रात होत नाही. हे औदार्याचे आणि सहिष्णुतेचे लक्षण वरवर वाटत असले तरी<br />\r\nवस्तुस्थिती अशी आहे की मराठी माणसाचा न्यूनगंड, भाषेबद्दलची बेफिकीरी आणि शासनाचा व मराठी बुद्धिवंतांचा बोटचेपेपणा आणि इच्छाशक्तीचा अभाव या गोष्टीच वरील सदगुणांना कारणीभूत आहेत असे म्हणावे लागेल. त्यामुळे भाषेची अधिक हेळसांड होते ही दुदैर्वी वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ महाराष्ट्राने कानडी किंवा आसामी अतिरेक्यांप्रमाणे वागावे असा नव्हे. उलट भाषेच्या प्रश्नाकडे nव्यापक परिप्रेक्ष्यातून सुसंस्कृतपणे कसे बघावे त्याचे दिशादर्शन महाराष्ट्र करू शकतो. मात्र त्यासाठी देखील आपल्या सत्ताधाऱ्यांना आणि सांस्कृतिक पुढाऱ्यांना इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी हवी.

खरे म्हणजे संपूर्ण भारतानेच भाषाप्रश्नाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. घटनासंमत अशा २१ अधिकृत भाषा भारतात असल्या तरी एकूण १७०० बोलीभाषा मातृभाषा म्हणून वापरल्या जातात. जगातील दुसऱ्या कोणत्याही देशात एवढे भाषावैचित्र्य आढळणार नाही. भाषा हे निव्वळ संवाद साधन नसून तिचा संबंध इतिहास, संस्कृती, अस्मिता आणि वंश यांच्याशीही जोडला जातो. हे स्फोटक मिश्रण भारतात ठासून भरलेले आहे. पुढील काही वर्षांत म्हणजे आथिर्क प्रगतीची घोडदौड होत असताना हे भाषिक व सांस्कृतिक संघर्ष वाढणे अटळ आहे. म्हणून भारताची एकता टिकवून प्रगतीची वाटचाल कायम ठेवण्यासाठी भाषेचा प्रश्न चिघळण्याआधीच ऐरणीवर घेणे आवश्यक आहे. औदार्य व सहिष्णुता हे जे गुण मराठी माणसाला अनाहूतपणे चिकटले आहेत त्यांचा फायदा घेऊन महाराष्ट्र या विषयात धोरणात्मक पुढाकार घेऊ शकतो.

करायचे काय आहे? हिंदीसह भारतातील बहुतेक भाषा या उत्क्रांत होणाऱ्या जग-व्यवहाराच्या भाषेशी स्पर्धा करू शकणार नाहीत. त्यामुळे बहुभाषिकता हे यापुढच्या पिढ्यांचे लक्षण ठरणार आहे. उच्च शिक्षण, करिअर व व्यवहार यासाठी जागतिक भाषा, आपल्या समाजातील व कुटुंबातील व्यवहार, सांस्कृतिक व साहित्य व्यवहार यासाठी राज्यभाषा म्हणजेच मातृभाषा आणि व्यवसाय व भौगोलिक स्थानपरत्वे इतर संपर्कभाषा. दिल्ली, मुंबई, बंगलोर अशा शहरांतील प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील मुले अशी बहुभाषक बनतात. त्यांचे प्रमाण इतरत्रही पसरत आहे. प्रश्न आहे तो आपापल्या मातृभाषांचे संवर्धन करण्याचा, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे व साहित्याचे संचित जपून त्याचे प्रतिबिंब जागतिक भाषेत नेण्याचा आणि अस्मिता रक्षणाचा. बालकांची आकलनशक्ती मातृभाषेतच अधिकतर तीव्र आणि परिपूर्ण असते या जगमान्य सिद्धांताचे काय झाले याचा शोध घ्यायला हवा. त्यामुळे जागतिक भाषेची तोंडओळख करून घेत असताना प्राथमिक ज्ञानग्रहण मातृभाषेत झाले पाहिजे हा आग्रह कितपत योग्य आहे याचीही शहानिशा झाली पाहिजे. भारतीय राज्यांची भाषिक पुनर्रचना करतांना जो सिद्धांत गृहित धरला होता त्याचा नीट पाठपुरावा ना केंद सरकारने केला ना राज्य सरकारांनी. या गोष्टीचीही झाडाझडती झाली पहिजे.

इच्छाशक्ती आणि कळकळ असेल तर महाराष्ट्र या विषयात पुढाकार घेऊ शकतो. त्यासाठी सध्याच्या भाषा व साहित्यसंबंधी असलेल्या शासकीय संस्थांना बाजूला ठेवून उच्च आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भाषातज्ज्ञांचा भाषा आयोग निर्माण करता येईल. त्यामार्फत महाराष्ट्रातील भाषा प्रश्नाचा जागतिक व भारतीय पार्श्वभूमीवर समग्र व सखोल अभ्यास करून मराठी भाषेच्या वर्तमान व भवितव्यविषयक वास्तवाचे<br />\r\nआणि अंदाजाचे वस्तुनिष्ठ निवेदन करणारा सविस्तर अहवाल सादर करता येईल. मराठी भाषेचे विविध आघाड्यांवर संवर्धन व संरक्षण करण्याचे कंकण बांधलेल्या कितीतरी स्वयंसेवी संघटना महाराष्ट्रात तळमळीने काम करीत आहेत. शासकीय भाषा व संस्कृती विभाग, विद्यापीठातील मराठी विभाग, अधिकृत साहित्य संस्था, परिषदा, मंडळे, संघ भाषाविषयक किंवा साहित्यविषयक असे काही काम करतांना क्वचितच दिसतात.<br />\r\nतथापि याही सर्व संस्था-परिषदा-विद्यापीठांना या कामात सामील करून घेतलेले बरे.

वस्तुनिष्ठ निवेदन व अंदाजावर आधारित हा आयोग धोरणात्मक निदेर्शन देखील करू शकेल. पुढील चार बाबतीतच धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची कणखरपणे अंमलबजावणी करावी लागेल.

अ)प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षणाचे माध्यम. विज्ञान शाखांचे व तंत्रज्ञानांचे शिक्षण मराठीत देणे कितपत शक्य आहे व त्यासाठी काय तयारी करावी लागेल - विशेषत: सोप्या परिभाषेची - त्याची आखणी करावी लागेल. याबाबतीत मात्र सर्वत्र समान धोरण हवे. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होते. जगभरातील माहिती व ज्ञान संचयाला ते हात घालू शकतात व स्पधेर्मधे पुढे निघून जातात. मराठी माध्यमाच्या मुलांना न्यूनगंड निर्माण होतो. राज्यघटनेनुसार अधिकृत राज्यभाषेचा माध्यम म्हणून सर्व शाळांवर सक्ती करता येत नसेल तर समानता राखण्यासाठी अटळपणे माध्यमिक शाळांचे माध्यम इंग्रजी ठेवणे भाग पडेल. त्यामधे ग्रामीण भागात मराठी आणि शहरी भागात इंग्रजी असा दुजा भाव करणे म्हणजे भविष्यासाठी भयंकर विषमतेची आणि संघर्षाची बीजे पेरल्यासारखे होईल. या आयोगानेच योग्य मार्गदर्शन करावे लागेल. आ)माध्यम म्हणून इंग्रजी भाषेचा स्वीकार केला नाही तरी जोडभाषा म्हणून शिकविण्यासाठी उत्तम दर्जाचे इंग्रजी व मराठी भाषा शिक्षक ग्रामीण भागात नेमणे. मुलांना ज्ञानभाषा आणि मातृभाषा दोन्ही चांगल्या आल्या पाहिजेत. माध्यम कोणतेही असो. जे तज्ज्ञ ठरवितील. इ)शिक्षणाचे माध्यम कोणतेही असले तरी राज्यातील सार्वजनिक व शासकीय व्यवहारात शक्यतो मराठीचा वापर होणे. शासनाने धोरणविषयक निर्णय घेऊन हे होणार नाही. त्यासाठी लोकांमधेच स्वभाषेचे सच्चे प्रेम हवे. ई)मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य इंग्रजी-हिंदीमधे किंवा नव्या जागतिक भाषेमधे नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा. महाराष्ट्रात शासन किंवा साहित्य संस्था कोणीही याबाबतीत संघटित प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे खरेच जागतिक भाषेचा लोंढा आला तर मराठीची परिस्थिती कठीण होईल. इ)महाराष्ट्राचे भाषाविषयक धोरण अखिल भारतीय धोरणाशी सुसंगत ठेवणे.

असे कोणते भाषाविषयक समान सूत्र आज तरी भारतात नाही. त्यामुळे महागड्या पब्लिक स्कूलांमधून शिकलेले आणि इंग्रजी ही मातृभाषेसारखीच असलेले आणि इतर भारतीय भाषांपासून दुरावलेले लोकच आज भारतावर औपचारिक आणि अनौपचारिक सत्ता गाजवतात. हे थांबवून भारतीय संस्कृतीचे संचित उगवत्या जागतिक संस्कृतीशी जोडायचे असेल तर सर्व प्रांतांमधून उठाव करून भाषाविषयक समान सूत्र स्वीकारायला हवे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाषातज्ज्ञ राष्ट्रपातळीवर मुख्यमंत्र्यांची व तज्ज्ञांची बैठक आयोजित करून राष्ट्रीय भाषा आयोग नेमण्याचा आग्रह धरू शकतात. प्रश्न तेवढा गंभीर आणि सर्वव्यापी आहे. कोणा एकाच भारतीय भाषेत आपण सर्व व्यवहार करू शकू, विज्ञान-तंत्रज्ञानाचा पूर्ण अवलंब करून उच्च दर्जा गाठू शकू आणि जागतिक स्पधेर्त टिकू शकू हा भ्रम आहे हे लवकरच लक्षात nयेईल. म्हणूनच असा व्यापक विचार-विनिमय करून धोरणे ठरविणे आताच आवश्यक झाले आहे.

प्रश्न आहे नेत्यांच्या इच्छाशक्तीचा आणि दूरदृष्टीचा. त्यांचा अभाव कायम राहिला तर भाषा-विषमता वाढीस लागून गंभीर परिस्थिती उदभवू शकेल. सगळ्यात जास्त तडाखा महाराष्ट्राला बसेल कारण आपण मराठी माणसे एका बाजूला इतरांपेक्षा मातृभाषेविषयी अत्यंत बेफिकीर असून तिला तुच्छपणे तर वागवतोच आणि दुसऱ्या बाजूला मात्र मराठीत सर्व काही आनंदी आनंद असून तिला काही झाले नाही, ही फक्त अमेरिकेत मुले पाठविणाऱ्या शहरी मध्यमवगीर्यांची ओरड आहे, असे सांगून निष्पाप मुलांना फसवीत असतो.

No Comments yet »

July 19th 2008

Marathi Online Forum

For all of you who are looking to intereact for other members, there is a forum available. Feel free to post your favorite article there. You can also write about कथा, कविता, विनोद, महाराष्ट्र- वगैरे वगैरे.

No Comments yet »

July 15th 2008

India in Olympics

Ever wondered how India is going to fare in this Olympics? I’d be impressed if they come back with even a single metal…. our shooting star is already out of competition, we never made it in hockey, and I don’t really have hope for Tennis.

What I find interesting is our best athlete performance is nowhere close to world record. So, then why do we bother spending people to Olypics? Why can’t a country of billion people not produce enough atheletes to compete?

[eminimall]

Take a look at China. They did not do so well in sports just over a decade ago. Then their government woke up and opened all these academies where they train athletes. Why can’t we do the same? It doesn’t cost much to open a school with good facilities, and talent certainly is not an issue in India.

After having ruled for centuries by mughals and british, we somehow lost the desire to win, and are content with what we have. This has got to change if India wants to become future superpower!!

No Comments yet »

August 2nd 2006

गणूचा फ्रेंडशिप डे

नुकताच साजरा झालेला फ्रेंडशिप डे गणूच्या आयुष्यात मॊठ्या अक्षरांत (किंवा फॉन्टमध्ये) लिहिला जाईल. याचे कारण म्हणजे, आयुष्यात प्रथमच त्याने आपल्या काही दोस्तांना पत्र लिहिले (ते अजून पोस्ट केले नाहीपण लिहिले हे काय कमीय!) आम्हाला त्याचा सुगावा लागला आम्ही ते अक्षरधन मिळविले…….ते जशास तसे देत आहोत……..

प्रिय मक्या, बालपणीचा काळ सुखाचाअसे म्हणतात. पण हे शब्द खोटे ठरविण्यासाठी ज्या ज्या मास्तरांनी माझा छळ केला, त्यांचा बदला घेण्याचे आद्यकर्तव्य पार पाडण्यास तू मला भाग पाडलेस. (म्हणूनच मी इथे() राहिलो). तर आज मी जो काही आहे (आणि नाही) त्याचे श्रेय तुला द्यावेच लागेल.

मला अजून आठवते. आपण सातवीत असताना, आपण शिकवणीसाठी जात असलेलो (हो..शाळेतलेच) माळी मास्तर. आपण रोज सकाळी त्यांच्या घरी शिकवणीसाठी जायचो आणि तू बाहेर लावलेली त्यांची सायकल गुपचूप पंक्चर करायचास. बिचारे सर, रोजचे पंक्चर काढून थकले, त्यांची तब्येत उतरली (आणि पंक्चरवाल्याची तब्येत सुधारली). एकदा मी नसताना, तू त्यांना म्हणालास..सर आज तुमची सायकल पंक्चर होणार नाही..कारण आज गण्या नाहीतुझ्या या वाक्याने माझे शालेय जीवनात वादळ आणले. माळी सरांनी मग माझी अशी काही कटाई केली की माझी शिक्षणबाग कधी फुललीच नाही. त्यांनी या गोष्टीचा बोभाट सर्वत्र केला आणि अकारण माझी इमेज बदलली. पोरं तर सोडाच, गुरुजी लोकसुद्धा गण्या..लेका सायकल लावू कापंक्चर तर करणार नाहीस, असे म्हणू लागले. दुसरी आठवण तर विसरणे, केवळ अशक्य. आपल्या शाळेत टिळक जयंतीनिमित्त विद्यार्थी वक्तांची नावे द्यावे, अशी नोटीस आली तेव्हा तू माझ्या परस्पर माझे नाव नोंदवले. ऐन कार्यक्रमात माझे नाव पुकारले गेलो..तेव्हा जो दरदरा फुटलेला घाम आहे, तो अजून थांबलेला नाही. त्या क्षणाने माझी शालेय सार्वजनिक जीवन उद्धवस्त केले. बळेच व्यासपीठावर आलोलोकमान्य टिळकांविषयी मी बापुडा काय सांगणारत्यांच्याविषयीचे माझ्या मनातल्या भावना मी शब्दांत व्यक्त करु शकणार नाहीअसे म्हणालोमाझ्या डोळ्यातले पाणी पाहून मला खाली बसविण्यात आले. ही तुझीच करामत असल्याचे नंतर लक्षात आले….टिळक तुला कधीच माफ करणार नाहीत. किती किती आठवणारदापके सरांच्या घरी सर रस्त्यावर पडल्य़ाचा माझ्या नावाने तू केलेला फोन, गायकवाड सरांना गाता येत नाही असे मी म्हणाल्याचा त्यांना केलेला रिपोर्ट, जांभळे मॅडम कविता शिकविताना उड्या मारतात, असा मी प्रसार केल्याचा तू केलेला प्रचार इत्यादी इत्यादीअशा प्रकारांमुळे काही कारण नसताना मी बहुतेक सर्व विषयांच्या शिक्षकवर्गाच्या कोपास पात्र जाहलोअनेकदा परिक्षेत अपात्र जाहलोगुरुजन पालकजनांकडून माझा छळ सुरु झाला त्यातून मला खरोखरच खोड्या करण्याचे बळ आले, हे गोष्ट निराळी. अजून काय लिहिणारफ्रेंडशिप डे दिवशी मला आता कुणी अचानक बोलायला लावले, तर मित्र नसावा तर असाहे मी सदोहारण देत बोलू शकतो.

आपल्या वेळी फ्रेंडशिप डे नव्हताअसता तर तू बकऱ्याला मारण्यापूर्वी त्याला सजवतात, तसे आमच्या हातात बॅंड लावून नंतर आमचा बॅंड वाजवला असता…(बॅंड लावला तू परिणाम साधलासतुसी बडे ग्रेट हो यार…) तू काय कुठे आहेसकाय करतोस माहिती नाही..तुला मी आठवणारही नाहीपण तुझी आठवण आल्याशिवाय आमच्या शाळेच्या आठवणीही सांगता येत नाहीत.  

No Comments yet »